Breaking News

 

 

नक्षलवाद्यांनी केली गडचिरोलीची वाहतूक बंद…

गडचिरोली (प्रतिनिधी) : नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली भागातली वाहूतक आज (रविवार) वाहतूक बंद झाली आहे. नक्षलवाद्यांनी एटापल्ली आलापल्ली मार्गावर झाडे तोडून मार्ग बंद पाडला आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बससेवेसह इतर वाहतूक बंद झाली आहे.

गुरुपल्लीजवळ वनविभागाची लाखो रुपयांची लाकडेही नक्षल्यांनी जाळली आहेत. २७ एप्रिलला रामको आणि शिल्पा यांच्या चकमकीतील मृत्युच्या निषेधार्थ आज गडचिरोली बंद माओवाद्यांनी घोषित केला. या पार्श्वभूमीवर जाळपोळ आणि ठिकठिकाणी पत्रके, फलक लावून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केले आहे. पोलिसांनी परिसरसात हाय अलर्ट जारी केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

282 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा