Breaking News

 

 

महापालिकेकडून रामानंदनगर येथील जयंती नाल्याची स्वच्छता…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवार) सकाळपासून जयंती नाल्याची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन हॉस्पीटल जवळील डि वॅटस् प्रकल्प, बालाजी पार्क परिसर, ऍ़ग्रीक्लचर लॅन्ड व रामानंदनगर, पाचगाव रोड याठिकाणाहून येणा-या नाल्यांच्या पात्रांची तसेच परिसराची स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतिने श्रमदान मधून घेण्यात आली.

यावेळी ड्रेनेज विभागचे कर्मचाऱ्यांनी सिध्दार्थ नगर बंधा-या नजिक परिसराची स्वच्छता केली. जयंती नाल्याचे रामानंदनगर येथील पात्राचे रुंदीकरण आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे पावसाळयामध्ये निर्माण होणारा जादा पाण्याचा प्रवाह हा प्रभावित राहणार असून कचरा व प्लॅस्टिक यामुळे पंचगंगा नदीचे होणारे प्रदुषणही कमी होणार आहे. यामध्ये
निसर्गप्रेमी नागरीकांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

यावेळी नगरसेवक किरण नकाते, उप-आयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगरसचिव दिवाकर कारंडे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

228 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा