Breaking News

 

 

आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त पर्यटकांना रविराज निंबाळकरांकडून मोफत मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांना पर्यटन राजदूत, इतिहास अभ्यासक रविराज निंबाळकर (शाही मराठा) यांनी मोफत मार्गदर्शन केले. याबद्दल पर्यटकांनी निंबाळकर यांचे आभार मानले.

निंबाळकर यांनी न्यू पॅलेस येथील श्री शहाजी छत्रपती म्युझियमधील वस्तूंची विस्तृत माहिती दिली. यावेळी  कोल्हापुरातील पर्यटकांबरोबर इतर जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांनी निंबाळकर यांच्यामुळे अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी श्रीमंत सौ. मधुरिमाराजे छत्रपती, फत्तेसिंग निंबाळकर, समरजित निंबाळकर, फत्तेसिंह जाधव, विश्वजित घाटगे, आदित्य सिंह निंबाळकर अभिजित कासार आदी उपस्थित होते.

2 thoughts on “आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त पर्यटकांना रविराज निंबाळकरांकडून मोफत मार्गदर्शन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *