Breaking News

 

 

मायक्रोएसडी कार्डच्या विश्वात क्रांती : आघाडीच्या कंपनीकडून १ टीबी कार्ड बाजारात !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने बदल होत आहे. मायक्रोएसडी कार्डच्या विश्वातही क्रांती व्हायला सुरुवात झाली आहे. ‘सॅनडिस्क’ या आघाडीच्या अमेरिकन कंपनीने जगातलं पहिलं 1 टॅराबाइट (TB) मायक्रोएसडी कार्ड लाँच केलं आहे. इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच आता  त्यामुळे भविष्यात डाटा स्टोअर करणं आणखी सोपं होणार आहे.

सॅनडिस्कने लाँच केलेलं ‘हे’ मेमरी कार्ड सुरूवातीला अमेरिका, स्पेन आणि जर्मनीत उपलब्ध केलं जाणार आहे. त्यानंतर भारतासह इतर देशांतील लोकांना ते ऑनलाईन खरेदी करता येईल, असं कंपनीने म्हटलं आहे. ‘सॅनडिस्क’ कंपनीचं हे मेमरी कार्ड ग्राहकांना अॅॅमॅॅझोनवर ऑनलाईन खरेदी करता येईल. या १ टीबी माइक्रोएसडी कार्डची किंमत संद्या ४५० डॉलर्स म्हणजेच ३१,५०० रुपये आहे. ‘सॅनडिस्क’चे हे मेमरी कार्ड जर तुम्ही कॅमेऱ्यात वापरणार असाल तर त्याची रायटिंग स्पीड ९० एमबी प्रतीसेकंद आणि डेटा रीड करण्याची स्पीड १६० एमबी प्रतीसेकंद अशी राहील असं कंपनीने म्हटलं आहे.

837 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश