दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील सर्वात मोठी बँक असणारी भारतीय स्टेट बँकेने पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधे अंतर्गत आता पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन स्लिप व्हॉट्स ॲपवरच मिळणार आहे.

ही सुविधा मिळवण्याची पद्धत खूप सोपी आहे. याशिवाय ग्राहकांना एसबीआय व्हॉट्सॲप बँकिंग सेवेद्वारे शिल्लक चौकशी आणि मिनी स्टेटमेंट देखील मिळू शकते. एसबीआयने आपल्या नवीन सेवेअंतर्गत व्हॉट्सॲपवर पेन्शन स्लिप मिळण्याच्या सुविधेची माहिती ट्विट पोस्टद्वारे दिली आहे. ही नवी सेवा ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.