कोल्हापूर (प्रातिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा पारा घसरला आहे. हा पारा १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने जिल्हा गेल्या १० वर्षात चौथ्यांदा गारठले आहे. दिवसभर निरभ्र वातावरण आणि ऊन असूनही थंडी जाणवत आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षातील हे नीच्चांकी तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडी अशीच राहण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीचा पारा सातत्याने घसरत आहे. दिवसभर थंडी जाणवत असातानाच रात्रीच्या वातावरणातही चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. २००७ नंतर गेल्या चार वर्षात नोव्हेंबर महिन्यात चौथ्यांदा हा पारा १५ च्या घरात आला आहे. कोल्हापूर शहरासह डोंगराळ भागात असणाऱ्या तालुक्यातही थंडीचा जोर कायम आहे.