Breaking News

 

 

पाऊस लवकरच येतोय ! : मान्सून पोहचला अंदमानात…

पुणे (प्रतिनिधी) : नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) आज (शनिवार) अंदमानात दाखल झाले आहेत. हवामान विभागाने याची आज (शनिवार) घोषणा केली. या मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे लवकरच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

येत्या तीन चार दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. आगामी ४८ तासात निकोबार बेटांवर पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

2,805 total views, 3 views today

One thought on “पाऊस लवकरच येतोय ! : मान्सून पोहचला अंदमानात…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग