कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजाकडून कायमच चुकीच्या दृष्टिकोनातून बघितले गेल्यामुळे काही वेळा हिंसेचा शिकार ठरलेल्या पारलिंगी (तृतीय पंथी) बांधवांचा स्मृतीदिवस ऐतिहासिक बिंदू चौकात पार पडला. मैत्री फाऊंंडेशन, अभिमान कोल्हापूर, फेथ फाऊंंडेशन आणि सार्थक क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्मृती दिवस पाळण्यात आला.

या दिवसानिमित्त मेणबत्या प्रज्वलित करून त्या सर्व तृतीय पंथी बांधवांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद असते असे मानणाऱ्या आपल्या समाजात अशा काही लोकांच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे विनाकारण अनेक पारलिंगी बांधवांना जीव गमवावा लागणे चुकीचे आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन या वर्गातील अनेक जण चांगल्या पदावरती काम करत असताना अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी निश्चित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.‌‍

यावेळी प्रा. साधना झाडबुके, डॉ. दीपा शिपूरकर, मयुरी आळवेकर, राज कोरगावकर, प्रा. डॉ. दीपक भोसले, विशाल पिंजलानी, डॉ. अश्विनी बाटे उपस्थित होते.