Breaking News

 

 

मंगळ मोहिमेच्या यशानंतर इस्रो ‘या’ ग्रहावर पाठवणार यान !

बेंगलुरु (वृत्तसंस्था) : मंगळ या ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी केल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्राशी संबंधित माहिती यानाद्वारे घेतली जाईल. २०२३ मध्ये ही मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे. इस्रोच्या मंगळ्यान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये विविध थर, वातावरण, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत या मोहीमेत अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेबाबतचे वृत्त समजताच जगभरातल्या सुमारे २० देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त मिळाले आहे.

येत्या १० वर्षांमध्ये इतरही अनेक मोहिमा आखून त्या यशस्वी करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. चांद्रयान-१ च्या प्रक्षेपणानंतर चांद्रयान २ चे प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. २०२२ मध्ये मंगळयान २ ही पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेची घोषणा केल्यानंतर आम्हाला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी व्यक्त केले आहे.

273 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा