Breaking News

 

 

नरेंद्र मोदींचे केदारनाथला साकडे

केदारनाथ (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. उद्या (रविवारी) लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात विधीवत पूजा करून विजयासाठी साकडं घातले आहे.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले. केदारनाथ मंदिरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (रविवार) बद्रीनाथाच्या मंदिराचे दर्शन घेणार आहेत. यावेळी केदारनाथ मंदिराबाहेर असलेल्या भाविकांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली.

नरेंद्र मोदींनी केदारनाथ मंदिरात खास पोशाख, डोक्यावर टोपी, हातात काठी या गढवाली पोशाखात प्रवेश केला. यावेळी त्यांनी तेथे विधीवत पूजा केली. तसेच विकास कामांचाही आढावा घेतला. लोकसभा निवडणुकांचा प्रचार १७ मे रोजी संपला आहे.

552 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे