काश्मीरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये आणखी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि अनंतनागमध्ये सुरक्षा रक्षक आणि अतिरेक्यांमध्ये ही चकमक झाली. पुलवामात झालेल्या चकमकीत हिज्बुलचा कमांडर शौकत डार मारला गेला आहे. शौकत डार जवान औरंगजेब यांच्या हत्येत सामील होता. 

पुलवामाच्या पंजगाममध्ये काल (शुक्रवार) रात्री चकमक झाली. याठिकाणी दोन ते तीन अतिरेकी लपले असण्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर अनंतनागच्या देहरुना गावात सकाळी चकमक सुरू झाली. गेल्या दोन दिवसांत सुरक्षा रक्षकांनी आठ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. काल (शुक्रवार) शोपियानमध्ये ३ आणि पुलवामात ३ अतिरेक्यांना मारण्यात यश आले आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले.

234 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram