Breaking News

 

 

पुन्हा सातारा – कोल्हापूर पॅसेंजर बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सकाळी ९.५५ ला येणारी सातारा – कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे, सकाळी १०.५० ची कोल्हापूर-मिरज, पहाटे ४, ४५ वाजता सुटणारी कोल्हापूर-पुणे, सायंकाळी ७.३० ला येणारी पुणे- कोल्हापूर या दोन पॅसेंजर रेल्वे नऊ दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. दि. २३ ते ३१ मे या कालावधीसाठी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे पुन्हा हाल होणार आहेत.

पुणे – मिरज मार्गावरील शेणोली – भवानीनगर – ताकारी मार्गावर दुहेरीकरणाचे तांत्रिक काम सुरु आहे. त्यामुळे पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने प्रशासनाने घेतला आहे. यामुळे नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी आदींना मोठ्या भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

तसेच दि. ३१ मे रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेस (कोल्हापूर-गोंदिया) दोन तास उशिराने धावणार आहे. दुपारी साडेतीन ऐवजी ही गाडी त्या दिवशी सायंकाळी सव्वा पाच वाजता कोल्हापूर स्थानकातून सुटणार आहे. कोयना (मुंबई-कोल्हापूर) एक्स्प्रेस दि. ३१ रोजी पुणे-कराड या मार्गावर दोन तास थांबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

825 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा