Breaking News

 

 

पक्षांसाठी घरासमोर पाण्याचे भांडे ठेवावे : डॉ.शां.ब.मुजुमदार

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आजच्या काळात पक्षी व प्राण्यांसह  विविध प्रजातींच्या वृक्षाचे मह्त्व ओळ्खून यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मानवाला जसा या पृथ्वीतलावर जगण्याचा हक्क आहे, तसा पशू पक्ष्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेता कामा नये. हिच बाब लक्षात घेवून लोकांनी पक्षांसाठी आपल्या घरासमोर पाण्याचे भांडे ठेवावे व शक्य तेवढे आपल्या परीसरात झाडे लावावी. असे प्रतिपादन सिंबायोसिस स्कूल, हरळी बुद्रूक येथे पद्मभूषण डॉ. शां ब मुजुमदार यांनी केले. यावेळी डॉ. शां.ब. मुजुमदार व संजीवनी मुजुमदार यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून सिंबायोसिस नेचर क्लबची स्थापना करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विक्रांत गुरव यांनी उपस्थिताचे स्वागत केले. तर संतोष आंबी यांनी नेचर क्लबच्या स्थापनेचा उद्वेश स्पष्ट केला. सिंबायोसिस नेचर क्लबमधील सहभागी विद्यार्थ्यांना गणवेश दिल्याबद्दल बाबूराव पोवार यांचे  अभिनंदन करण्यात आले.

यावेळी विष्णूपंत हरळीकर, अरुणराव हरळीकर,शामराव हरळीकर, बाळासाहेब सुभेदार, हिंदूराव नौकुडकर, बळवंत गुरव ,उपसरपंच प्रदीप पाटील,पो. पा. सौ. रेणुका परीट,केरबा बामणे यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

506 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा