दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२२ वर्षातील १० महिने निघून गेले. नोव्हेंबर हा ११ वा महिनाही संपत आला आहे. सर्वांना ख्रिसमस आणि ख्रिस्ती नववर्षाचे वेध लागलेत. या दरम्यान आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर २०२२ महिन्यातील बँक हॉलिडेची यादी जाहीर केली आहे.

आरबीआय आपल्या वेबसाईटवर दर महिन्यात किती दिवस बँकचे कामकाज बंद राहणार, याची यादी प्रसिद्ध करते. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये एकूण १३ दिवस बँक बंद असणार आहेत. या १३ दिवसांमध्ये ४ रविवारचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना उर्वरित ९ दिवस सुट्टी असणार आहे.

काही सुट्ट्यांमध्ये स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे. बँकाचे कामकाज बंद जरी असले तरी ऑनलाईन कामकाज सुरुच असणार आहे. इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करु शकता. अनेकदा काही राज्यांमध्ये विशेष दिवशी सुट्टी असते; मात्र तेव्हा इतर राज्यात सुट्टी असतेच असे नाही. बँकांना काही राष्ट्रीय सुट्ट्या असतात. तेव्हा मात्र संपूर्ण देशात बँका बंद असतात. देशात डिसेंबरमध्ये अनुक्रमे ३, ४, १०, ११, १८, २४ आणि २५ तारखेला बँका बंद असणार आहेत.