Breaking News

 

 

…त्यामुळेच आम्ही जांभूळखेडा भूसुरुंग स्फोट घडवला !

गडचिरोली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी कसनासूर बोरिया येथे झालेल्या चकमकीचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीतील जांभूळखेडा भूसुरुंग स्फोट घडवून आणला, अशी मग्रूर प्रतिक्रिया नक्षलवाद्यांची व्यक्त केली आहे. अशा आशयाची पत्रकं नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांत फेकली आहेत. महाराष्ट्र दिनी झालेल्या जांभुळखेडा नक्षलवादी हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते तर एका वाहनचालकाचा मृत्यू झाला होता.

नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल समितीने काढलेल्या या पत्रकात म्हटले आहे की, प्रतिरोध सप्ताहादरम्यान आम्ही कसनासूर बोरीयाच्या चकमकीच्या निषेधार्थ जांभुळखेड्यात भूसुरुंग स्फोट घडवले. जवानांवर यशस्वीपणे हल्ला केल्याबद्दल नक्षलवाद्यांच्या कॅडरचे संघटनेने अभिनंदन केले आहे. सुरक्षा दलांविरुद्ध जनसंघर्ष तीव्र करण्याचे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कसनासूर बोरीया आणि नैनर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींत सुरक्षा दलाच्या जवानांनी ४० नक्षलवाद्यांना ठार मारले होते. या हल्ल्याला एक वर्ष झाल्याने नक्षलवाद्यांकडून प्रतिरोध सप्ताह पाळला जात होता. या सप्ताहादरम्यानच जांभूळखेड्याचा हल्ला घडवून आणण्यात आला.

315 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा