Breaking News

 

 

मतमोजणी केंद्रे रविवारपर्यंत सुसज्ज करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ च्या ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतमोजणी (दि. २३) रोजी करण्यात येणार आहे. ही मतमोजणी केंद्रे रविवार पर्यंत सर्व दृष्टीने सुसज्ज करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ते मतमोजणी केंद्र व परिसर व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आज (शुक्रवार) बोलत होते.

या बैठकीला कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) सतिश धुमाळ यांच्यासह सबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, रमनमळा, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय गोदाम राजाराम तलाव नजिक, सरनोबतवाडी रोड, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. त्याचे सर्व यंत्रणानी तंतोतत पालन करावे, असे सांगितले.

तसेच मतमोजणीच्या दिवशी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना ऐनवेळी काही वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी ॲम्ब्युलन्स, पॅरामेडीकल स्टाफ, वैद्यकीय अधिकारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित ठेवावेत. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी कार्यरत मनुष्यबळाला वेळच्यावेळी चहा, नाष्टा, जेवण, पाणी पुरवावे. त्याचा दर्जा चांगला असावा. पुरेशी स्वच्छतागृह असावीत, इंटरनेट, इंटरकॉम, लॅन आदी सुविधा विहीत नियमानुसार बॅरागेटींग आदी अनूषंगिक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

261 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा