कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतवासीयांमध्ये संविधानवाद रुजावा, यासाठी भारतीय संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त कोल्हापुरात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान सन्मान मार्चचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मोर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मार्चची सुरुवात सकाळी १० वा. बिंदू चौकातून होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर मार्गी दसरा चौकात येऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या मार्चची सांगता होणार आहे. संविधान जनजागृतीसाठी प्रशिक्षण शिबिर, परिसंवाद, विद्यार्थी सवांद, प्रबोधन शिबिर, चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला समिती सचिव पी. एस. चोपडे, समन्वयक वैभव कांबळे, रघुनाथ मांडरे, दिगंबर लोहार, दिलीप वायदंडे, संभाजी कांबळे, सतीश भारतवासी, डॉ. शरद गायकवाड, सुशीलकुमार कोल्हटकर, प्रा. एच. टी. कांबळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.