Breaking News

 

 

क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला मिळणार ‘या’ रकमेचे पारितोषिक…

इंग्लड (वृत्तसंस्था) :  इंग्लंडमध्ये ३० मे पासून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा महासंग्राम सुरु होणार आहे. यात जिंकणाऱ्या संघाला आयसीसी ४० लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार विजेत्या संघाला २८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात विजेत्या संघाला देण्यात येणारी ही सर्वात मोठी रक्कम ठरणार आहे.

ही वर्ल्ड कप स्पर्धा ४६ दिवस रंगणार आहे. यात विजेत्या संघाला ४० लाख डॉलर तर उपविजेत्या संघाला २० लाख डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. सेमीफायनलला पोहचणाऱ्या संघांना ८ लाख डॉलर बक्षीस मिळणार आहे. वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत जिंकणाऱ्या संघाला ४० हजार डॉलर तर साखळी फेरीतून बाद फेरीत पोहचणाऱ्या संघाला एक लाख डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे.

आयसीसी वर्ल्ड कपमधील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये १० संघ सहभागी होणार असून क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर अंतिम सामना १४ जुलैला होणार आहे.

501 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा