Breaking News

 

 

काँग्रेसलाच सत्तास्थापनेसाठी प्रथम आमंत्रित केले पाहिजे : गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्याच भूमिकेवरून घुमजाव करण्यात राजकीय नेते प्रवीण असतात. यामध्ये कोणत्याच पक्षाचे नेते मागे नाहीत. भाजपप्रणीत एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस पंतप्रधानपदावर दावा करणार नाही. इतर कोणालाही पाठिंबा देऊ, पण भाजपला सत्ता मिळू देणार नाही, असे विधान दोनच दिवसांपूर्वी त्यांनी केले होते. याच विधानावरून त्यांनी पलटी मारली आहे. काँग्रेस हाच सर्वांत मोठा आणि जुना पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हालाच सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसच्या या बदललेल्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पंतप्रधानपदासाठी काँग्रेसला ऑफर दिली नाही तरी पक्ष तो प्रतिष्ठेचा मुद्दा करणार नाही. भाजप आणि नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं मुख्य धोरण आहे असं त्यांनी बिहारमध्ये स्पष्ट केले होते.  आझादांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जात होतं. या विधानावरून त्यांनी आता कोलांटी मारली आहे. काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही हे खरं नाही. काँग्रेस हाच सर्वात मोठा आणि जुना पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हालाच सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाच वर्ष स्थिर सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसच सर्वात योग्य पक्ष आहे असंही ते म्हणाले.

348 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा