Breaking News

 

 

मालेगाव बॉम्बस्फोट : एनआयएच्या विशेष कोर्टाचा साध्वी प्रज्ञा, पुरोहितला दणका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहावे, असे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज (शुक्रवार) दिले. आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा समावेश आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भादंविअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा फौजदारी कट रचणे, तो अमलात आणणे, त्याद्वारे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. या प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात उपस्थित रहावे, असे आदेश दिले आहेत. आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.

492 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे