मुंबई : शेअर बाजारातील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी अस्थिरता दिसून आली. आज सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८७ अंकांची घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३६ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज ०.१४ टक्क्यांची घसरण होऊन तो ६१,६६३ अंकावर स्थिरावला. निफ्टीमध्ये ०.२० टक्क्यांची घसरण होऊन तो १८.३०७ अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही २० अंकांची घसरण होऊन तो ४२,४३७ अंकांवर पोहोचला. आज शेअर बाजार बंद होताना एकूण १४२४ शेअर्समध्ये वाढ झाली. १९६६ शेअर्समध्ये घट झाली. आज एकूण ११९ शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.