मुंबई (प्रतिनिधी) : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाने वाझेला मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे; मात्र वाझेला जामीन मंजूर झाला असला तरी त्यांची इतर प्रकरणांमुळे जेलमधून सुटका होणार नाही.

ईडीने वाझेला जामीन देण्यास नकार दिला होता; मात्र न्यायालयाने हा विरोध फेटाळला आणि वाझेला जामीन दिला आहे. वाझेच्या जामीनावर १५ नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानुसार आज १८ नोव्हेंबरला निकाल लागणार होता. ईडीने वाझेवर गुन्हा दाखल केला होता.

वाझेने सीआरपीसी सीआरपीसी कलम ८८ नुसार जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता; मात्र ईडीने या जामीनासाठी विरोध केला. आज अखेर न्यायालयाने वाझेच्या बाजूने निर्णय देत त्याला मोठा दिलासा दिला. सहा महिन्यांपूर्वी १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला विशेष सीबीआय न्यायालयाने सरकारी साक्षीदार होण्यास परवानगी दिली होती.

अटकेपूर्वी आणि नंतरही आपण सीबीआयला सहकार्य केल्याचे वाझे याने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याचा जबाब नोंदवला आणि सीबीआय न्यायालयाने काही अटींसह वाझेला दिलासा दिला. याबाबत सचिन वाझे याने मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली होती. आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावे, असा अर्ज वाझेंनी मुंबई सत्र न्यायालयात केला होता.