Breaking News

 

 

लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी थंडावणार…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज (शुक्रवार) संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहे. रविवारी १९ मे रोजी ८ राज्यांत ५९ जागांवर मतदान होत आहे. पश्चिम बंगालमधील ९ उत्तर प्रदेशातल्या १३ मतदारसंघात रविवारी मतदान होत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसीत मतदान होत आहे. वाराणसी वगळता इतरत्र मात्र काँटे की टक्कर अपेक्षित आहे. त्यासाठी काँग्रेस, सपा-बसपानं उत्तर प्रदेश पिंजून काढला आहे. 

अत्यंत चुरशीच्या आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा रविवारी पार पडत आहे. पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आसुसलेली भाजपप्रणीत एनडीए तर एनडीएला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जंग जंग पछाडणारी काँग्रेसप्रणीत युपीए, तर दोन्ही आघाड्यांची पुन्हा सत्ता नको असा पवित्र घेतलेली तिसरी आघाडी यांच्यात काट्याची लढत पहावयाला मिळाली. रविवार १९ रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर संपूर्ण देशालाच नव्हे, जगातील प्रमुख देशांनाही २३ रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची उत्सुकता लागली आहे.

आज संध्याकाळी प्रचार संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (शनिवार) केदारनाथला दर्शनासाठी जाणार आहेत. केदारनाथाचे दर्शन घेतल्यावर पंतप्रधान ध्यान गुहेत जाणार आहेत. ध्यान गुहेची निर्मिती पंतप्रधानांच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे. केदारनाथाचे पूजन केल्यावर तिथल्या विकासकामांचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षय्यतृतीयेला केदारनाथाच्या दर्शनासाठी जातात, मात्र यंदा प्रचारामुळे त्यांना जाता आले नव्हते. आता पंतप्रधान उद्या केदारनाथला जातील.

303 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *