Breaking News

 

 

पोलीस ठाण्यातच मुलीचा विनयभंग : जबाब घेताना पोलीसाकडून कृत्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीचा राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसाने जबाब घेताना  विनयभंग केल्याचा प्रकार राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये आज (गुरुवार) घडला. चेतन दिलीप घाडगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क) (बक्कल नंबर ४२०) असे पोलिसाचे नाव आहे.

राजारामपुरी पोलिसानी दिलेली  माहिती अशी की, राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलगी दिनांक  5 मे रोजी घरातून कुणालाही न सांगता निघून गेली असल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या घरच्यांनी​ दिली होती. पण १४ मे रोजी मुलगी स्वतःहून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांना सांगितले की मी माझ्या मित्रांच्याबरोबर पुण्याला गेले होते. यानंतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मुलीच्या घरच्यांना बोलवून घेतले.

मुलगी तुमच्या ताब्यात द्यावयाची आहे,  तिची वैद्यकीय तपासणी करायची आहे. आपली काही तक्रार  असेल तर सांगा, असे पोलीसांनी पालकांना सांगितले. अन्यथा मुलगीला बालसुधारगृहामध्ये दाखल करावे लागेल. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी आणि जबाब घेण्यासाठी  मुलगीला आणि पालकांना पोलीस स्टेशनला बोलवले. बुधवारी संध्याकाळी तिचे सगळी  कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलगीने आपल्या आईला जबाब घेणाऱ्या पोलिसांनी​ माझ्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचे सांगितले.

यावेळी तिच्या आईने वरिष्ठांच्या कानावर ही घटना घातल्यानंतर त्याची सत्यता पडताळण्यासाठी वरिष्ठांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर होम डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना कळविल्यानंतर रात्री वेळाने पोलीस चेतन घाडगे याच्यावर कलम ३५४ आणि (पोस्को) बाल लैंगिक अत्याचार अशा कलमाखाली कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. पोलीसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

1,178 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा