Breaking News

 

 

रंकाळा नजीकच्या खणीत चिमुरडीचा बुडून मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वय अवघे नऊ वर्षे, पण उत्कृष्ट वक्तृत्व आणि पट्टीची पोहणारी समृद्धी रंकाळा तलावा शेजारील खणीत नातेवाईकांसोबत दररोजच्याप्रमाणे आज (गुरुवार) सकाळी पोहायला गेली आणि या चिमुरडीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. समृद्धी अमित सूर्यवंशी (रा. देवकर पाणंद) असे या मृत मुलीचे नाव आहे. पण मृत्यूनंतर नेत्रदान करून, नातेवाईकांनी समृद्धीच्या स्मृती जतन करून ठेवल्या.

देवकर पाणंद परिसरात आई-वडील आणि छोट्या बहिणीसह समृद्धी रहात होती. वडिल एका विमा कंपनीत नोकरी करतात. सर्वांशी हसत-खेळत असणारी समृद्धी परिसरात बाल वक्तृत्व पटू म्हणुन परिचित होती. अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने पंचवीसहून अधिक पारितोषिके आणि चाळीस-पन्नासहुन अधिक प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत.

सुट्टीच्या काळात ती नेहमी पोहायला जात होती. आज सकाळीही ती रंकाळा तलावा नजीक असणाऱ्या खणीत पोहायला गेली होती. पण काही वेळातच ती अचानक पाण्यावर तरंगायला लागली. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला बाहेर काढून तिच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढले. आणि तिला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

समृद्धीच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईकांनी जड अंतकरणाने तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

210 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे