Breaking News

 

 

जाणून घ्या, निवडणूक आयोगाने प्रथमच वापर केलेले कलम ३२४ !

कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान हिंसाचार झाला. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये ज्या ९ लोकसभा मतदारसंघांमध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे, तिथं गुरुवारी रात्री दहापासून प्रचार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या मतदारसंघांमधील प्रचार १७ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता संपला असता. मात्र, २४ तासात राज्यात वाढलेला तणाव आणि हिंसाचार लक्षात घेता निवडणूक आयोगाने राज्यघटनेच्या कलम ३२४ च्या आधारे १९ तास आधीच प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने ज्या कलम ३२४ चा वापर केला आहे, ते जाणून घेऊ.

कलम ३२४ अंतर्गत निवडणूक आयोगाचे अधिकार –

१) भारतीय राज्यघटनेनुसार राज्यांची विधीमंडळं, संसद आणि राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींच्या निवडणुकींवर देखरेख, निवडणुकीशी संबंधित दिशानिर्देश आणि निवडणूक नियंत्रण हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे.

२) निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त यांची निश्चित अशी संख्या असते. राष्ट्रपती वेळोवेळी ही संख्या निश्चित करत असतात. याखेरीज मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा कायदा संसदेत बनतो. राष्ट्रपती त्यावर आपली मोहर उमटवतात.

३) संसदेने पारित केलेल्या कुठल्याही कायद्यांतर्गत राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले निवडणूक आयुक्त आणि प्रादेशिक आयुक्त यांची सेवा आणि कार्यकाळ बदलता येत नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्यासाठी त्याच प्रक्रियेचं पालन करावं लागतं, जी देशाच्या सरन्यायाधीशांबाबत लागू होते.

४) कुठलेही निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक निवडणूक आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्तांचा सल्ला घेतल्याशिवाय पदावरून काढता येत नाही.

५) निवडणूक आयोगाने विनंती केल्यास आयोगाने दिलेली कामं पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती किंवा एखाद्या राज्याचे राज्यपाल एक अतिरिक्त निवडणूक आयुक्त किंवा एक प्रादेशिक आयुक्त निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देऊ शकतात.

489 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे