Breaking News

 

 

जिल्हा जलतरण निवड चाचणी स्पर्धा विक्रम खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राज्य अजिंक्यपद जलतरण निवड चाचणी स्पर्धेसाठी १८ मे रोजी इचलकंरजी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय जलतरण निवड चाचणी स्पर्धेवरुन अधिकृत जलतरण संघटनाबाबत निर्माण झालेला वाद अखेर विक्रम खाडे यांच्यावर स्पर्धेच्या मार्गदर्शनाची जबाबदारी देऊन आज (गुरुवार) मिटवण्यात आला.

जिल्हास्तरीय जलतरण राज्य निवड चाचणी स्पर्धा १८ मे रोजी इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या कै. शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे होणार आहे. या स्पर्धा कोणत्या संघटनेमार्फत होणार याबाबत संभ्रमावस्था होती. हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष शशिकांत सावंत यांनी आपल्या संघटनेमार्फत स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले होते. पण या संघटनेवर अविश्वास दाखवून खेळाडूंचे पालक व प्रशिक्षक यांनी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेताल होता.

हा वाद स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गेल्यानंतर खेळाडूंचे नुकसान होवू नये यासाठी असोसिएशनमार्फत ऑलम्पिंक जलतरणपटू वीरधवल खाडे यांचे वडील विक्रम खाडे यांच्यावर या स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली. तसे पत्रही खाडे यांना असोसिएशनने दिले. त्यानुसार स्पर्धेसाठी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य निता तळवलकर, कमलेश नगरकर, संतोष पाटील यांच्यावर निरिक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. या स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्या स्पर्धकांची निवड विक्रम खाडे यांच्यामार्फत होवून त्यांची नावे राज्य असोसिएशनकडे पाठवण्याचे निश्चित करण्यात आले.

याबाबत विक्रम खाडे यांनी ही जबाबदारी केवळ विद्यार्थ्यांचे व खेळाचे नुकसान होवू नये, यासाठी स्विकारले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. आणि खेळाडूंनी आपली नावे आपल्या प्रशिक्षकांकडे द्यावीत, असे आवाहन केले. तर प्रशिक्षक व पालकांनी विक्रम खाडे यांच्यावर विश्वास ठेवून बहिष्कार मागे घेत असल्याचे सांगितले. प्रसाद पाटील यांनीही विक्रम खाडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्या हौशी जलतरण संघटनेमार्फत स्पर्धेत आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवून सहभागी होणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रशिक्षक मानसिंग पाटील, निळकंठ आखाडे आदी उपस्थित होते.

960 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश