कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या वतीने आज (गुरुवार) रंकाळा टॉवर ते शिंगणापूर नाका परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ५ हातगाड्या व ९ खाटा, १७ स्टॅन्ड बोर्ड व ४ शेड व दुकानासमोरील ६ छपऱ्या काढण्यात आल्या. तसेच १३ हातगाड्या स्वतः गाडी मालकाने काढून घेतल्या.

ही कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या आदेशानुसार इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सजन नागलोत,  मुकादम रवींद्र कांबळे, शरद कांबळे, राजू माने यांच्यासह पथकाने केली.