Breaking News

 

 

बेकायदेशीर केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी : प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयामध्ये बीएसएनएल, जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडीया या कंपनीसह अन्य खाजगी कंपन्यांच्याकडून ग्रामीण भागामध्ये नेटवर्कच्या सुविधा देण्याच्या नावाखाली रस्त्याच्या बाजूला ओएफसी केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. या बेकायदेशीर केबल टाकणा-या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व संबंधित ठकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ. प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये रस्त्यांच्या बाजूला संबंधीत विभागाची कोणतीही परवानगी न घेता ओएफसी केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते नादुरुस्त करण्याचे काम या कंपनीकडून सुरु आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता हा केंद्र शासनाचा प्रोग्राम असल्याचे धडधडीत सांगण्यात येत आहे. ही केबल टाकताना काही नियमावली आखुन दिल्या आहेत. यापैकी कोणत्याही नियमावलींचे पालन होताना दिसत नाही.

प्रामुख्याने केबल टाकताना रस्त्याच्या सेंटरपासून १५ मी. अंतरावर केबल टाकणे बंधकारक आहे. केबल टाकताना ज्या रस्त्यावर केबल टाकावयाची आहे त्या विभागाचे संबंधित सरपंच, ग्रामसेवक, उप अभियंता यांना कळवून त्या विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधकारक आहे. संबंधित विभागाने केबल टाकताना रस्त्याच्या मध्यापासून लाईन पटटी टाकून देणे, नंतर चर मारणे व ती वेळेत मुजवून घेणे याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदारांवर आहे. परंतु रस्त्याच्या कडेला असणा-या बाजूपटीमध्ये ३ ते ४ फुट खोल चर मारुन केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. नव्याने बनविलेले रस्ते नादुरुस्त करण्याचे काम ठकेदारांच्याकडून सुरु आहे. केबलसाठी मारलेल्या चरी वेळेत न मुजवल्याने अपघातांच्या प्रमाणाध्ये वाढ झाली आहे.

त्यामुळे हे काम बेकायदेशीरपणे सुरु असून चुकीच्या पध्दतीने केबल टाकणा-या कंपनीचे अधिकारी,कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

2,772 total views, 3 views today

One thought on “बेकायदेशीर केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी : प्रकाश आबिटकर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे