Breaking News

 

 

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा : डॉ. मिरजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरी व ग्रामीण भागामध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आहार, व्यायाम, रक्तदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हदयरोगज्ञ डॉ. उदय मिरजे यांनी केले. ते आज (गुरुवार) जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ. मिरजे म्हणाले की, सततच्या तणावामुळे उच्च रक्तदाब हा कोणालाही होऊ शकतो. अगदी वयाच्या १२ व्या वर्षापासून उच्च रक्तदाब होत आहे. उच्च रक्तदाब हा मूक हत्यार असून यामुळे हृदयरोग, मूत्रपिंड रोग, पक्षाघात (स्ट्रोक), डोळ्य़ाची समस्या होऊ शकतात. यासाठी निरोगी आहार घ्यावे, भरपूर पाणी प्यावे तसेच  दररोज व्यायाम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी धूम्रपान, तंबाखूसारख्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. तसेच नियमितपणे उच्च रक्तदाबाची तपासनी करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा उपचार करण्यासाठी कोल्हापूरातील शरण्या हार्ट केअर सेंटरला भेट देण्याचे आवाहन डॉ. मिरजे यांनी केले आहे.

813 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग