Breaking News

 

 

…तर मी मोदींना तुरुंगात पाठवणार : ममता बॅनर्जी

कोलकाता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोचला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तृणमूलच्या गुंडांनी फोडल्याचा पंतप्रधान मोदींनी केला. आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातूचा पुतळा उभारू अशीही घोषणा केली. या घोषणेला ममता बॅनर्जींनी आव्हान दिलं आहे. विद्यासागर यांचा पंचधातुचा पुतळा उभारण्याची घोषणा मोदींनी केली. मात्र जो २०० वर्षांपासूनचा वारसा होता तो मोदी परत करू शकतात का? असा प्रश्न करीत आमच्या कार्यकर्त्यांवरील आरोप सिद्ध न झाल्यास मोदींना तुरुंगात पाठवू, असा इशारा ममता बॅनर्जींनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक रंगताना दिसते आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांनी याआधीही मोदींनीही त्यांच्यावर निशाणा साधला. आता ममता बॅनर्जींनी मोदी यांना उदाहरण देऊन टीका केली आहे.

मथुरापुर येथील सभेत त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोग भाजपचा भाऊ असल्यासारखे वागत आहे. याआधी आयोग ही एक नि:पक्षपाती संस्था मानली जात असे, मात्र संपूर्ण देश आता म्हणत आहे की, तो भाजपला विकला गेला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर मोदी पुतळा फोडल्याचा आरोप करत आहेत. हा आरोप सिद्ध झाला नाही तर मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? मोदी हे सातत्याने खोटं बोलत आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही आरोप केले आहेत ते ठीक आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात धाडेन, असा इशाराही ममता बॅनर्जींनी दिला आहे.

915 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा