सिमेंटच्या दरात कपात करावी : राजीव परीख

पुणे (प्रतिनिधी) : भारतातील सर्व सिमेंट कंपन्यांनी सिमेंटची किंमत प्रती बॅगमागे ३० टक्क्यांनी वाढविल्याने सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. यामुळे बांधकाम खर्चात देखील वाढ होणार असून विकसकांना आणि पर्यायाने ग्राहकांना देखील याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे सिमेंटच्या दरात कपात करावी, या मागणीचे निवेदन क्रेडाई महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. लवकरच हे निवेदन प्रत्येक शहरातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष  राजीव परीख यांनी दिली. 

परीख यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हे निवेदन याआधीच देण्यात आले आहे. अवाजवी दरवाढीमुळे २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकणार नाही. बांधकाम व्यवसाय हा सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. तसेच यावर अवलंबून असणाऱ्या इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करणाऱ्या व्यवसायांवर देखील या भाववाढीचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या दरवाढीवर पुनर्विचार करून सरकारने सिमेंट कंपन्यांना दरात कपात करण्याचे आदेश द्यावेत असेही निवेदनात म्हटले आहे.

549 total views, 3 views today

One thought on “सिमेंटच्या दरात कपात करावी : राजीव परीख”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram