Breaking News

 

 

अॅस्टर हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना मिळणार अर्थसहाय्य : आनंद मोटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अॅस्टर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना वेळेवर आर्थिक मदत व्हावी यासाठी अॅस्टर डीएम हेल्थकेअर अॅस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटरतर्फे अर्थसहाय्य करणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे सीईओ आनंद मोटे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

मोटे यांनी सांगितले की, या अर्थसहाय्यमध्ये अॅस्टर इसी केअर, क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म, धर्मादाय समुदायमार्फत रुग्णांना ही सेवा दिली जाणार आहे. यामध्ये बजाज ट्रस्ट, सिध्विनायक ट्रस्ट, अॅस्टर डीएम फाऊंडेशन आणि डॉ. मुपेन कौटुंबिक फाउंडेशनतर्फे गरजू आणि गरीब रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

यामध्ये सर्जरी, किडनी प्रत्यारोपण, मेंदू ट्युमर, लहान मुलांच्या आजारावर उपचार, अचानकपणे उद्भवणारे आजार तसेच दुर्घटनांमुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचारांसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. अॅस्टर डीएम हेल्थकेअरतर्फे भारतातील ५ राज्यांमध्ये ११ हॉस्पिटल व आगामी २ हॉस्पिटलमध्ये अर्थसहाय्य दिले जात असल्याचे मोटेंनी सांगितले. यावेळी सुहास दामले, शिवानंद अपराद, अमोल कडोलीकर आदी उपस्थित होते.

840 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग