काळजवडेतील जांभळी नदीवर त्वरित पूल बांधण्याची मागणी

बाजारभोगांव (प्रतिनिधी) : काळजवडे (ता.पन्हाळा) या ठिकाणी असणारी जांभळी नदी ही पूर्णपणे आटत चालली आहे. पाणी नसल्यामुळे हिरवीगार पिके करपली जात आहेत. या नदीवर पूलही बांधला गेला नाही. अनेक वर्षे राजकीय नेते ग्रामस्थांना या नदीवरील पुलाचे आमिष दाखवून मतदान मिळवत आहे. त्याचबरोबर नारळ फोडून पुलाचे उद्घाटन करून जात आहेत. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही नेत्याने या पुलाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्रास होत असून येथे लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

काळजवडे हे बाजारभोगाव परिसरातील  मध्यवर्ती ठिकाण असून या गावातील जांभळी नदीवरील पुलाचे काम होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते. काळजवडे येथे  केंद्र शाळा, विनय कोरे हायस्कूल काळजवडे हे असून या शाळांमध्ये सुंभेवाडी, सावतवाडी, पिसात्री त्याचबरोबर अनेक वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांचे पावसाळ्यात दोन-तीन महिने शैक्षणिक नुकसान  होत आहे. याला सर्वस्वी शासन व या विभागातील प्रतिनिधी सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.

अनेक लोकांच्या जमिनी नदीपलीकडे आहेत. त्यांना देखील ये-जा करताना झाडावरून तयार केलेल्या पुलावरून जनावरांना वैरण आणणे शक्य होत नाही, त्यामुळे जनावरांचे देखील हाल होतात. शेतीसाठी उन्हाळ्यात देखील पाणी कमी पडत असून पाणी अडवण्यासाठी जांभळी नदीवर पुलाचे काम होणे गरजेचे आहे.

954 total views, 3 views today

2 thoughts on “काळजवडेतील जांभळी नदीवर त्वरित पूल बांधण्याची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram