Breaking News

 

 

भुदरगड आरोग्य विभागातील रिक्त जागा भरा, अन्यथा आंदोलन : प्रहार संघटना

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत. तालुक्यातील रुग्णांच्यावर योग्य व वेळेवर उपचार करावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. भुदरगडचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे यांनी भुदरगड पं.स.गटविकास अधिकारी यांना पंधरा दिवसांची मुदत एका निवेदनाद्वारे दिली आहे. पंधरा दिवसात मागण्या  मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

भुदरगड तालुक्याची आरोग्यदायिनी म्हणून गारगोटी ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. शिवाय मडिलगे, पाटगाव, कडगाव, पिंपळगाव, मिणचे अशी प्राथमिक आरोग्य केंद्रे तर बारवे, वेसर्डे येथे आयुर्वेदिक दवाखाना आहे. तालुक्यात एकूण तीस आरोग्य उपकेंद्र आहेत .यानुसार तालुक्याला आरोग्य सेवा पुरवली जाते. परंतु सध्या या ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये बरीचशी रिक्त पदे आहेत. वैद्यकीय अधिकारी बारा मंजूर पदांपैकी नऊ पदे रिक्त आहेत.

याचबरोबर परिचर, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक, वाहन चालक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ही पदे सुद्धा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने भुदरगड मधील रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होताना दिसत आहे. शिवाय रुग्णांवर सरकारी दवाखान्यातून कर्मचाऱ्यांच्या अभावी उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्णांचा खासगी दवाखान्याकडे ओढा वाढला आहे.

कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांमुळे नियुक्त कर्मचाऱ्यांच्यावर अतिरिक्त ताण पडून त्याचा कामावर परिणाम होताना दिसत आहे. एकूण मंजूर पदांपैकी ५६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे दुर्गम वाडी-वस्तीवर विखुरलेल्या तालुक्यांमधील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, कार्याध्यक्ष प्रदीप पाटील, शशिकांत वाघरे, विकी मोरे,प्रशांत जगताप, अण्णा किल्लेदार, अवधूत भाट, योगेश शिंदे, हर्षल शिंदे आदी उपस्थित होते.

144 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे