Breaking News

 

 

बंगालमधील प्रचार काही तासातच संपणार….

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण निवडणूक काळात भाजप व तृणमूल काँग्रेसमधील हिंसक संघर्षामुळे पश्चिम बंगालमधील प्रचाराचा कालावधी केंद्रीय निवडणूक आयोगाने २४ तासांनी कमी केला आहे. त्यामुळे आज (गुरुवार) रात्री १० वाजता प्रचार संपणार आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यामधील रोड शोच्या वेळी  मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर आयोगाने अखेरच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या राज्यातील ९ मतदारसंघांतील प्रचार एक दिवस आधीच रोखला आहे. यासोबतच ममता बॅनर्जी सरकारला धक्का देत पश्चिम बंगालचे प्रधान गृह सचिव व अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या बदलीचेही आदेश काढले आहेत.

१९ मे रोजी निवडणुकीचा अखेरचा टप्पा असून, सात राज्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यांतील प्रचार कालावधी मात्र कमी करण्यात आलेला नाही. ख्यातनाम समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडफोडीप्रकरणी निवडणूक आयोगाने संताप व्यक्त केला आहे. तसेच, दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली आहे. 

396 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग