Breaking News

 

 

निकालापूर्वीच मायावती – अखिलेश एकमेकांवर हल्ले करतील : योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २३ मेला लोकसभेचा निकाल लागण्याआधीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाची महाआघाडी तुटेल. मायावती आणि अखिलेश हे एकमेकांवर हल्ले करतील, असे भाकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. यावेळीही उत्तर प्रदेशात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी योगी म्हणाले, सपा-बसपाची युती २३ मेचा निकाल लागण्याआधीच तुटेल. मायावती आणि अखिलेश यादव त्याआधीच एकामेकांवर हल्ले करुन रक्ताचे पाट वाहायलाही कमी करणार नाहीत. हिंसाचार होऊ नये यासाठी मी आधीच पोलिसांना राज्यात कडेकोट बंदोबस्त करण्याची सूचना दिली असल्याचे योगींनी सांगितले.

336 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे