कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंंडेशन व जिजाऊ महिला महिला समितीच्या वतीने कागल येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्र शासनाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ सर्वसामान्य युवक-युवतींंना व्हावा, या उद्देशाने शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेच्या आयोजन केले आहे. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकांना पोलीस भरत मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे स्वरूप समजावे व मैदानावरील प्रात्यक्षिकांचा सराव व्हावा, या एकमेव हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

एक दिवसाच्या या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सकाळी ९ ते १० उपस्थितांची नाव नोंदणी होईल. ११ ते  दु.१२.३० लेखी पेपर, दुपारी १.३० ते ३ मार्गदर्शनपर व्याख्यान, दुपारी ३ ते ४ मैदानावरील प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाणार आहे. ही स्पर्धा कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागल व जागृती हायस्कूल गडहिंग्लज या ठिकाणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या कार्यशाळेसाठी आपली नाव नोंदणी दि. २४ नोव्हेंबर अखेर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.