Breaking News

 

 

बोंद्रेनगरमधील जुगार अड्ड्यावर छापा : सात जणांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने आज (बुधवार) बोंद्रेनगर मातंग वसाहतीत जोतिबा मंदीरासमोर असलेल्या नाथाजी पोवार (रा. आर.के.नगर) यांच्या पडक्या घराजवळ झाडाखाली खुलेआम तीन पानी पत्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून त्याच्या कडून १०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत दौलत काशीनाथ सावंत (वय ३१, रा. बोंद्रेनगर), यल्लाप्पा गंगाराम शहापूरकर (वय ५४, रा. महालक्ष्मी कॉलनी), भोला आकाराम गोसावी (वय ४०, रा. बोंद्रेनगर), निवास तमन्ना भोरे (वय २५, रा. बोंद्रेनगर), दिनकर राजाराम साळोखे (वय ४८, रा. बोंद्रेनगर), अमोल अशोक वायदंडे (वय २४, रा. बोंद्रेनगर), राजू तानाजी गोसावी (वय ३६, रा. बोंद्रेनगर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख १०,५०० रुपये, पत्ते जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक तानाजी सावंत, पोलीस उपनिरिक्ष सचिन पंडीत, पोलीस हेड कॉ. अजय वाडेकर, अशोक पाटील, प्रकाश संकपाळ, रणजीत कांबळे, ओकांर परब, सुरेश पाटील, रमेश डोईफोडे, संतोष माने यांनी केली.

436 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा