उत्तम कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून शाबासकी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आज (बुधवार) जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरव केला. आज झालेल्या गुन्हे विषयक बैठकीत हा गौरव झाला.

मार्च महिन्यात कळे येथील बँक चोरीप्रकरणी उत्तम तपास करुन गुन्हा उघडकीस केल्याबद्दल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व कळे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना रोख ३५ हजार रुपये व प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले. एप्रिलमध्ये खून प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल करवीर पोलीस ठाण्याला रोख १० हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अमोल कोळेकर, सचिन पाटील, वैभव दड्डीकर यांना बहिर्जी नाईक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये, प्रमाणपत्र देण्यात आले. शिरोळ पोलीस ठाण्याने या महिन्यातील सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून मान पटकावला. त्यांना दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. मोक्कातील फरार आरोपींना अटक केल्याबद्दल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला दोन विशेष पारितोषिके देण्यात आली. प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षिसे देण्यात आली.

375 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram