किणी टोल नाक्यावरील अन्यायाविरुद्ध कुटुंबांचा संघर्ष लढा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील एका कुटुंबाला टोल आकारणी करण्याच्या वादातून किणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण, लूट आणि विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. यावर दहा महिन्यांच्या कालावधी उलटला तरी कोणतीच कारवाई झाली नसल्याने या अस्वस्थ कुटुंबाने ‘आम्हाला न्याय हवा’ अशी आर्त हाक देत प्रसार माध्यमांकडे धाव घेतली.

यावेळी गौरी भिसे आणि विशाल भिसे या दांपत्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, २ आक्टोंबर २०१८ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास कारमधून नातेवाईकांसह किणीटोल नाक्यावर आलो असता  आमच्या मामांनी सैन्यदलाचे ओळखपत्र दाखवून टोल न घेण्याची विनंती केली. पण तेथील कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तणूक करून शिवीगाळही केली. याबाबत कर्मचाऱ्याना जाब विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली. तसेच महिलांनाही अर्वाच्च शिव्या देत विनयभंग केला.

तसेच आमच्या मामांची आठ तोळयाची सोन्याची चेन हिसकाऊन घेतली. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पण त्यानंतर आता आठ महिने होऊन गेले तरी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही. वडगांव पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयातून फक्त तपास सुरू आहे, इतकेच सांगीतले जाते. पोलिसांनी घटने दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. पण आम्हाला मात्र ते उपलब्ध करुन दिलेले नाही. संबधीतांवर कारवाई करावी, लूट करून घेतलेली चेन परत मिळावी आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी आमचा संघर्ष सुरू असल्याचे भिसे यांनी सांगीतले.

327 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram