Breaking News

 

 

अश्विनी बिद्रे खून खटल्यात आता प्रदीप घरत ‘विशेष सरकारी वकील !

मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची शासनाने नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार  (रायगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे यांच्या पती आणि कुटुंबीयांनी घरत यांच्या नियुक्तीची मागणी केली होती.

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसह राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनी २०१६ साली हत्या केल्याचा आरोप आहे. महेश फळणीकरने पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितले होते  की, ११ एप्रिल २०१६ रोजी वरील चौघा आरोपींनी बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर लाकूड कापायच्या कटर मशिनने अश्विनी यांच्या शरीराचे बारीक तुकडे केले व ते वसईच्या खाडीत फेकले. नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वीच हा गुन्हा उघडकीस आणला होता. मात्र, आरोपी कबुली देत नसल्याने तपास रेंगाळला होता. मुख्य आरोपी कुरुंदकर हा पोलिस निरीक्षक असल्याने पोलिस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप अश्विनीचा पती राजू गोरे यांनी केला होता. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर या खुनाचा उलगडा झाल्याचा दावा राजू गोरे यांनी केला.

गोरे आणि कुटुंबीयांनी आम्हाला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल  निकम यांच्याऐवजी प्रदीप घरत यांची नियुक्ती करा, अशी मागणी १९\११\२०१८ रोजी शासनाकडे आणि  कोर्टाकडे  अर्जाद्वारे केली होती. प्रदीप घरत यांनी विशेष सरकारी वकील म्हणून ‘हिट आणि रन’ या खटल्यात सलमान खानला तर पत्रकार जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

306 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा