स्वा. सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’चा बुधवारी कोल्हापुरात प्रयोग : नितीन वाडीकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळ, कोल्हापूर आणि सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हे मृत्युंजय’ हे नाटक सादर केले जात आहे. केशवराव भोसले नाट्यगृह येथे २२ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता या नाटकाचा प्रयोग होणार असून नाटकासाठी स्वेच्छा मुल्य आकारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन वाडीकर आणि सावरकर प्रतिष्ठानचे सुनील वालावलकर यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

अंदमान म्हणजे साक्षात मृत्यू ! मृत्यूचं साम्राज्य असलेल्या अंदमानातला छळ आणि शिक्षा सहन करण्यापेक्षा आत्महत्या करणं तिथे बंदिवासात असलेल्या क्रांतीकारकांना जास्त सोयीचं वाटत असे. सावरकरांना सुध्दा याच कारागृहात डांबण्यात आलं… तिथला जेलर क्रूरकर्मा डेव्हिड बॅरी याने त्यांचाही अतोनात छळ करायचा प्रयत्न केला. मानसिक त्रास देवून त्यांचं मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण सावरकर या सगळ्याला पुरून उरले. या अद्वितीय संघर्षाची कहानी म्हणजे हे मृत्यूंजय.

मृत्यू आणि सावरकर यांच्या संवादातून हे नाट्य उलगडत जाते. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांचे आहे. या नाटकाचे साठच्यावर प्रयोग झाले असून महाराष्ट्रा बाहेर दिल्ली आदी ठिकाणी हिंदी भाषेत तीन प्रयोग झाले आहेत. शार्दूल आपटे, बिपीन सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका असून सावरकरांची भूमिका अजिंक्य ननावरे हे साकारत आहेत.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी, शालीनी शेटे, राजेंद्र शिंदे, सुनिल नाईक आदी उपस्थित होते.

108 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram