विकाराबाद इथे झालेल्या अपघातात दोन तेलगु टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यू…

नवी दिल्ली : शुटींग संपवून आपल्या घरी परतत असताना गाडीचा अपघात झाला आणि या अपघातात अनुषा रेड्डी (वय २१) आणि भार्गवी (वय २०) या दोन दोन तरुण तेलुगु टीव्ही अभिनेत्रींना आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना आज (बुधवार) सकाळी विकाराबाद इथं घडली. त्या हैदराबादमध्ये आपल्या आगामी प्रोजेक्टचं शुटींग संपवून दोन्ही अभिनेत्री घरी परतत होत्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात या दोघींनी आपला जीव गमावलाय. समोरून येणाऱ्या ट्रकपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीनं गाडी बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचं गाडीवरून नियंत्रण सुटलं आणि गाडी सरळ समोरच्या एका झाडावर आदळली. या गाडीमधून चार अभिनेत्री प्रवास करत होत्या. त्यापैंकी दोघींचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीररित्या जखमी झाल्या. जखमींवर हैदराबादच्या ओसिमानिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

209 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram