विश्वचषक स्पर्धेस मुकलेल्या ऋषभ पंतची भारत ‘अ’ संघात वर्णी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय विश्वचषकात संधी गमावलेल्या ऋषभ पंतला बीसीसीआयने भारत ‘अ’ संघात संधी दिलेली आहे. आगामी विंडीज आणि श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध सामन्यांसाठी बीसीसीआयने आज (बुधवार) संघाची घोषणा केली.

यामध्ये विंडीज ‘अ’ संघाविरुद्ध ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पंतला संघात स्थान देण्यात आलेले आहे. मनिष पांडे विंडीज ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करेल.

या व्यतिरिक्त २०१८ वर्षात दुखापतीमुळे बाहेर असलेल्या वृद्धीमान साहानेही पुनरागमन केले आहे. विंडीजविरुद्ध दोन दिवसीय कसोटी सराव सामन्यांसाठी साहाची यष्टीरक्षक म्हणून संघात निवड झाली आहे. साहाच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने कसोटी संघात यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली होती. वन-डे विश्वचषकानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सराव सामन्यांमधून छाप पाडत साहा कसोटी संघात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

183 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram