मुंबईच्या आरोही पंडीतने केला अटलांटिक महासागर पार…

मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबईची रहिवासी असलेल्या आरोही पंडित (वय २३) या तरुणीनं एक नवा इतिहास रचलाय. आरोही पंडीत ही लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट (एलएसए) च्या साहाय्यानं अटलांटिक महासागर ओलांडणारी जगातील पहिली महिली बनलीय. सोमवार आणि मंगळवारी आरोहीनं आपल्या छोट्या विमानासोबत एकटीनंच स्कॉटलंडच्या ‘विक’ पासून उड्डाण घेतलं. जवळपास ३,००० किमीचा प्रवास करत तिनं कॅनडाच्या इकालुइट एअरपोर्टवर लॅन्डिंग केले. 

आरोही एलएसए लायसन्सधारक आहे. तिचं ‘माही’ हे छोटं विमान एक सिंगल इंजिन साइनस ९१२ जहाज आहे. याचं वजन एका बुलेट बाईकहूनही कमी म्हणजेच जवळपास ४०० किलोग्रॅम आहे. या मोहिमेसाठी आरोहीनं गेले सात महिने ‘बॉम्बे फ्लाईंग क्लब’मधून ट्रेनिंग घेतलं होतं. खराब वातावरणातही उड्डाण घेत तिनं आपलं ट्रेनिंग पूर्ण केलं होतं. 

या दरम्यान आरोहीनं आइसलँड आणि ग्रीनलँडला थांबा घेतला. आरोहीनं हे उड्डाण ‘वी! वूमन एम्पावर एक्सपीडिशन’ अंतर्गत घेतलं. आरोहीच्या विमानाचं नाव ‘माही’ असं होतं. रनवे वर उतरल्यानंतर तिनं विमानातून खाली उतरत भारताचा तिरंगा फडकावला. नवा इतिहास आपल्या नावावर जमा झाल्यानं आरोही अत्यंत आनंदी आहे.

33 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram