नेसरीतील तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील बेपत्ता युवकाचा गिजवणे बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश शंकर कांबळे (वय २९, रा. नेसरी) असे युवकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद त्याचे वडील शंकर चंद्रव्वा कांबळे (सध्या रा. सराफ चौधरीनगर, कांदिवली पूर्व, मुंबई, मूळ गाव – हनिमनाळ, ता. गडहिंग्लज) यांनी दिली.

गणेश हा आपल्या मूळ गावी आला होता. रविवार दि. १२ रोजी तो कोणास न सांगता घरातून निघून गेला होता, अशी फिर्याद शंकर कांबळे यांनी गडहिंग्लज पोलीसात दिली होती. आज सकाळी गिजवणे बंधाऱ्यात त्याचा मृतदेह आढळला. गणेश मानसिक तणावाखाली फिरत-फिरत हिरण्यकेशीच्या पात्रात पाय घसरून अथवा तोल जाऊन मयत झाला असल्याचा गडहिंग्लज पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

312 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

देश-विदेश

 

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram