कागल (प्रतिनिधी) : किल्ला बनवा स्पर्धेमुळे युवा पिढीवर गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक ठेवा जपण्याचे संस्कार होत आहेत असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी
येथील शिवराज नागरी पतसंस्थेमार्फत घेण्यात आलेल्या किल्ला बनवा स्पर्धेतील बक्षीस वितरणवेळी ते बोलत होते.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, शिवराज पतसंस्थेचे संस्थापक व कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, माजी नगराध्यक्षा माणिक माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

किल्ला स्पर्धेतील विजेते : प्रथम- मुलांचे निरीक्षण गृह अलका शेती फार्म, द्वितीय-वीर जवान भीम मंडळ, तृतीय-बोटिंग क्लब. उत्तेजनार्थ- शिवशाही मित्र मंडळ, हर्षद पाटणकर, पृथ्वीराज तिरवेकर, मयूर पाटील, यशोधन भोंगाळे, कोष्टी गल्ली.

रांगोळी स्पर्धा : प्रथम- मोनिका बोंगाळे, द्वितीय- कल्याणी कालेकर, तृतीय- दिव्या पाटील, उत्तेजनार्थ- सलोनी पाटील, नेहा काळेबेरे, नेहा माळी सपना पालनकर, वर्षा खोत, श्रुती वनीरे अथर्व चिंदगे, अर्चना अडसूळ, नेहा कौलकर, नेहा शहा.

परीक्षक म्हणून वि.म. बोते व जगन्नाथ भोसले यांनी काम पाहिले. नवोदिता घाटगे, रमेश माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, नितीन नाशिपुडै उपस्थित होते. स्वागत सुशांत कालेकर यांनी केले. गजानन माळी यांनी आभार मानले.