गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरव देवाची जयंती उद्या बुधवार. दि. १६ रोजी सालाबादप्रमाणे काळभैरव डोंगर येथे होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दि. १५ रोजी रात्री ९ ते ११ श्री केरबा पाटील (जखेवाडीकर) यांचे कीर्तन व संगीत भजनाचा तसेच उद्या दि. १६ कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी रोजी सकाळी ११ ते १२ नाथपंथी डवरी बंधू यांची काळभैरव जन्मकथा व दुपारी १२ वाजता श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा होणार आहे. त्यांनतर श्रींची आरती होईल. सकाळी १० पासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दि.२७ रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प. बाळासो शामगिरी महाराज (कूर, ता. भुदरगड) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काळभैरव मंदिरच्या पुजारींकडून करण्यात आले आहे.