Breaking News

 

 

ममतांना आता जनताच नमवेल : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. जेव्हा सार्‍या सीमा संपतात, तेव्हा पतन अटळ असते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता तेथील जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमित शाह यांच्या रोडशो दरम्यान वाहनांवर लाठ्या फेकण्यात आल्या. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला. यावेळी ते बोलत होते.

निवडणुकीच्या प्रारंभीपासूनच ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या वाढत्या जनाधाराचा धसका घेतला आहे.  भाजप नेत्यांना जाणुन- बुजून पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी मनाई करण्यात येत आहे. नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारली जात असून, जणू हे राज्य म्हणजे केवळ ममतांची मालकी असे समजून राज्य कारभार हाकला जात आहे.

तसेच अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये हत्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक लढविताना ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांचा रोड शो शांतपणे होत असताना त्यांच्या ट्रकवर लाठ्या फेकण्यात आल्या आणि तृणमूलचे कार्यकर्ते भाजपा कार्यकर्त्यांवर चालून गेले. त्यामुळे ममता बॅनर्जींनी पराभवाचा किती धसका घेतला, हे स्पष्ट होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने सुद्धा या सर्व प्रकारांची गांभिर्याने दखल घ्यावी. तेथील निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

258 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा